http://wiser-u.net/blog/tedxwiseru/yogesh-kulkarni/

विज्ञान आश्रमाच्या कामा निमित्ताने मला अनेक ठिकाणी बोलण्याची व लिहण्याची संधी मिळते. मला स्वत:ला यातून खुप शिकायला मिळते.या सर्व लिखाणावर विज्ञान आश्रमातील (www.vigyanashram.com ) कामाचा व डॉ.कलबाग यांच्या ’Rural Development through Education system (RDES)' या संकल्पनेचा खुप प्रभाव आहे. असं सर्व प्रासंगिक लिखाण या ब्लॉग वर मांडण्याचा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या सुचना व चर्चेचे स्वागत आहे. आपला : डॉ.योगेश रमेश कुलकर्णी
Wednesday, December 14, 2011
सृजनशील – कल्पकतेच्या .. थोडक्यात भविष्यातील शिक्षणासाठी....
सृजनशील – कल्पकतेच्या .. थोडक्यात भविष्यातील शिक्षणासाठी....
मित्रांनो,
आपण सर्वजण भाग्यवान आहोत. मानवाच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या ‘माहीती तंत्रज्ञान क्रांती (Information revolution` चे आपण साक्षिदार आहोत.
‘What is specific to human beings is their Great ability to adapt` हे Socrates ने सांगितले होते. आपण सर्वजण माहीती तंत्रज्ञानामुळे झालेला बद्दल स्विकारत आहोत. शिक्षणाच्या बाबतीत मात्र हा बदल वर वरच स्विकारत आहोत. ‘कसे शिकायचे?‘ यासाठीची आपली बदल प्रक्रीया बैलगाडीच्या वेगाने बदलत आहे.
Friday, December 9, 2011
IBT ची स्वयंपुर्णता आणि लोकोपयोगी सेवा
IBT ची स्वयंपूर्णता आणि लोकोपयोगी सेवा
प्रास्ताविक
डॉ.कलबाग यांनी मांडलेल्या ’शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास (Rural development through education system (RDES)) तत्वज्ञानुसार आपण शाळांमधून ’मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख (Introduction to Basic Technology (IBT)) राबवत आहोत.
लोकोपयोगी सेवा हा RDES संकल्पनेचा आत्मा आहे. शाळा हे उत्पादन करणारे / गावाला सेवा देणारे केंद्र असावे हे यात अभिप्रेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देता येते. व ’काम करत करत शिकणे’ हे ख-या अर्थाने साध्य करता येते. प्रात्यक्षिकातून अनुभव मिळतो पण लोकोपयोगी सेवांचा अनुभव हा अधिक जिवंत व वास्तविक असतो. त्यामुळे IBT राबवणा-या तज्ञांना ’लोकोपयोगी सेवा’ ही अत्यावश्यक वाटते. काही निदेशकांना व शाळांना लोकोपयोगी सेवा ही त्रासदायक वाटते. तर संस्थाचालक व आर्थिक मदत करणा-यांना IBT स्वयंपूर्ण होण्याचा रामबाण उपाय म्हणजेच लोकोपयोगी सेवा वाढवणे आहे असे वाटते. लोकोपयोगी सेवांची उद्दीष्टे , त्या कडून असलेल्या अपेक्षा व अडचणी या विषयी स्पष्टता यावी व IBT च्या स्वयंपूर्णते बाबत माझी मते मांडावी हा या लेखाचा उद्देश आहे.
Monday, November 21, 2011
विद्यार्थ्यांमधील कृतीशीलता व बुध्दीमत्ता विकासासाठी शालेय अभ्यासक्रमात कौशल्य शिक्षण
सारांश :
शालेय स्तरावर कौशल्य शिक्षण अंतर्भूत करण्याचा उद्देश हा विद्यार्थांना केवळ रोजगार मिळावा हा नक्कीच नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण वाढीसाठी, त्यांच्यातील विविध बुध्दीमत्तांचा व व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी शालेय शिक्षणात ’उत्पादक कामाचा’ समावेश व्हायला हवा. नविन बुध्दीमत्तेवरील संशोधनाने शिक्षण प्रक्रीयेत ’मन, मेंदू आणि मनगट’ हे एकत्र आल्यावरच चांगले शिक्षण मिळू शकते हे सिध्द केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये श्रम प्रतिष्ठा, संघभावना, व्यवहार ज्ञान, सृजनशीलता यांचा विकास होण्यासाठी शाळेत उत्पादक काम व शालेय विषय यांची सांगड घालावी लागेल. माध्यमिक स्तरावरील कौशल्य शिक्षणाकडे ’व्यवसाय शिक्षण’ असे मर्यादीत न पहाता, ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २००५’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे बुध्दीमत्ता विकासासाठीची शैक्षणिक पध्दत म्ह्णून पाहीले पाहीजे. याच उद्देशाने महाराष्ट्र व इतर राज्यातील ९० च्या वर माध्यमिक शाळांमधे यशस्वीपणे राबवल्या जाणा-या ’मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ (व्ही १) या व्यवसाय पूर्व अभ्यासक्रमाच्या अनुभवावर हा लेख आधारित आहे.
Monday, July 25, 2011
विज्ञान आश्रमा चे संस्थापक डॉ.श्रीनाथ शेषगिरी कलबाग
विज्ञान आश्रमा चे संस्थापक डॉ.श्रीनाथ कलबाग यांचा जन्म 23 ऑक्टो 1928 रोजी दस-याच्या दिवशी झाला. त्यांच्या वडीलांचे पॉप्युलर फार्मसी नावाचे मुंबर्इत दुकान होते. शाळेत असल्यापासूनच विज्ञानाकडे त्यांचा कल होता. घरी ते विविध प्रयेाग करत उदा. साबून तयार करणे, रसायने वापरून कपडे ब्लिंचिंग करणे , कागदावर छपार्इ इ.
Saturday, June 25, 2011
श्रीमती मिरा कलबाग : विज्ञान आश्रमाच्या अम्मा
शिक्षणातून ग्रामीण विकास या ध्येयाने गेली २८ वर्षे विज्ञान आश्रम ही संस्था पुण्याजवळील पाबळ येथे कार्य करत आहे. ’हाताने काम करत शिकणे’ हीच शिकण्याची नैसर्गिक पध्दत आहे यावर डॉ.कलबागांचा विश्वास होता. प्रचलित शिक्षण पध्दतीत शिकण्याची नैसर्गिक पध्दत कशी आणता येईल हे सिध्द करण्यासाठी ’विज्ञान आश्रम’ या शिक्षणाच्या प्रयोगशाळेची स्थापना डॉ.कलबाग यांनी केली. मुंबई तील हिंदुस्थान लिव्हर कंपनीतील वरिष्ठ संशोधकाची नोकरी सोडून पाबळ सारख्या छोट्या दुष्काळ्ग्रस्त गावात येऊन रहाण्याचे धाडस डॉ.कलबाग करु शकले याचे महत्वाचे कारण म्ह्णजे त्यांच्या पत्नी श्रीमती मिरा कलबाग यांनी त्यांना दिलेली मोलाची साथ होय.
सृजनशील शिक्षण
पॅरीस युनिर्व्हसिटीचे डॉ. फ़्रानझ्वा नुकतेच पाबळला येऊन गेले. त्यांच्या बरोबर अनेक विषयावर गप्पा झाल्या.
कार्य केंद्री शिक्षणाचे महत्व व विद्यार्थ्यांना कृतीशील बनवणारे शिक्षण असे मुद्दे माझ्याकडून मांडले जात होते. त्यावर त्यांनी मला शिक्षणाचे भवितव्य किंवा भविष्यातील शिक्षणा विषयी प्रश्न विचारले. त्यातून मला आपल्या सध्याच्या कामाच्या तुटी जाणावल्या व आपला कार्यक्रम हा केंव्हातरी बदलावा लागेल असे वाटले.
Subscribe to:
Posts (Atom)