शिक्षणातून ग्रामीण विकास या ध्येयाने गेली २८ वर्षे विज्ञान आश्रम ही संस्था पुण्याजवळील पाबळ येथे कार्य करत आहे. ’हाताने काम करत शिकणे’ हीच शिकण्याची नैसर्गिक पध्दत आहे यावर डॉ.कलबागांचा विश्वास होता. प्रचलित शिक्षण पध्दतीत शिकण्याची नैसर्गिक पध्दत कशी आणता येईल हे सिध्द करण्यासाठी ’विज्ञान आश्रम’ या शिक्षणाच्या प्रयोगशाळेची स्थापना डॉ.कलबाग यांनी केली. मुंबई तील हिंदुस्थान लिव्हर कंपनीतील वरिष्ठ संशोधकाची नोकरी सोडून पाबळ सारख्या छोट्या दुष्काळ्ग्रस्त गावात येऊन रहाण्याचे धाडस डॉ.कलबाग करु शकले याचे महत्वाचे कारण म्ह्णजे त्यांच्या पत्नी श्रीमती मिरा कलबाग यांनी त्यांना दिलेली मोलाची साथ होय.

विज्ञान आश्रमाच्या कामा निमित्ताने मला अनेक ठिकाणी बोलण्याची व लिहण्याची संधी मिळते. मला स्वत:ला यातून खुप शिकायला मिळते.या सर्व लिखाणावर विज्ञान आश्रमातील (www.vigyanashram.com ) कामाचा व डॉ.कलबाग यांच्या ’Rural Development through Education system (RDES)' या संकल्पनेचा खुप प्रभाव आहे. असं सर्व प्रासंगिक लिखाण या ब्लॉग वर मांडण्याचा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या सुचना व चर्चेचे स्वागत आहे. आपला : डॉ.योगेश रमेश कुलकर्णी
Saturday, June 25, 2011
सृजनशील शिक्षण
पॅरीस युनिर्व्हसिटीचे डॉ. फ़्रानझ्वा नुकतेच पाबळला येऊन गेले. त्यांच्या बरोबर अनेक विषयावर गप्पा झाल्या.
कार्य केंद्री शिक्षणाचे महत्व व विद्यार्थ्यांना कृतीशील बनवणारे शिक्षण असे मुद्दे माझ्याकडून मांडले जात होते. त्यावर त्यांनी मला शिक्षणाचे भवितव्य किंवा भविष्यातील शिक्षणा विषयी प्रश्न विचारले. त्यातून मला आपल्या सध्याच्या कामाच्या तुटी जाणावल्या व आपला कार्यक्रम हा केंव्हातरी बदलावा लागेल असे वाटले.
Subscribe to:
Posts (Atom)