'प्रत्यक्ष हाताने
काम करणे' आपल्याकडे नेहमीच कमी दर्जाचे
मानले जाते. कारकुनी, कार्यालयीन कामाला
आपण
श्रेष्ठ मानतो.
खरंतर संशोधक, अंतराळ वीर शल्यचिकित्सा करणारे डॉक्टर ,कलाकार इ. अनेक यशस्वी व्यक्तींच्या यशामध्ये त्यांच्या कौशल्याचा फार
मोठा वाटा असतो. ही कौशल्य केवळ पुस्तके ज्ञानातून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने विकसित होतात. विद्यार्थ्यांमधील
धडपड करण्याची वृत्ती, कृतीशीलता, उपक्रमशीलता
इ .अनेक गुण विकसित होण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष हाताने काम करण्याची संधी मिळायला हवी.
कामावर आधारलेले शिक्षण हे केवळ गरीब विद्यार्थाना रोजगार मिळविण्यासाठी वा अभ्यासात गती नसलेल्यांसाठी असा गैरसमज आहे. हाताने काम करण्याचे बौद्धिक विकासासाठी असलेले महत्व आपण समजावून घेतले पाहिजे .
कामावर आधारलेले शिक्षण हे केवळ गरीब विद्यार्थाना रोजगार मिळविण्यासाठी वा अभ्यासात गती नसलेल्यांसाठी असा गैरसमज आहे. हाताने काम करण्याचे बौद्धिक विकासासाठी असलेले महत्व आपण समजावून घेतले पाहिजे .
पाबळ गावा मध्ये उद्यानाची
निर्मिती
विज्ञान आश्रम , पाबळ येथे
ग्रामीन तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम राबविला जातो. पाबळ गावात मुलांना खेळण्यासाठी, निवांत पणे पुस्तके वाचण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी किंवा सहज फिरण्यासाठी चांगली जागा नाही
हा प्रश्न तीन महीन्यापूर्वी चर्चेत आला व चर्चेअंती अशा उद्यानाची निर्मीती हा प्रकल्प म्हणून निवडण्यात आला. उद्यानाचे स्वरूप
कसे
असावे, जागा कुठे असावी, कुठल्या गोष्टी असाव्यात
,काळजी
काय घ्यावी ,अंदाजे खर्च किती येईल यावर चर्चा झाली . इंटरनेट वरून विविध बागा व त्यांचे डिझाईन याचा अभ्यास केला गेला. स्थानिक उपलब्ध मटेरियल व भंगार यांच्या याद्या झाल्या. विद्यार्थ्यांनी प्रस्तावित जागेचे संकल्प चित्र तयार केले . त्यासाठी Google sketch हे software
त्यांना शिकावे लागले. उपलब्ध जागेत काम करताना त्याचे मापन, ड्रॉईंग, क्षेत्रफळ काढणे,
इ . अनेक गोष्टी विद्यार्थी शिकले . उद्यानातील निवारा छत्री
चे डिझाइन करताना बल ,कार्य ,लोड ,दाब ,इ अनेक अभ्यासक्रमातील भाग शिक्षकांनी power point च्या माध्यमातून शिकविला. बागेसाठीची खेळणी बनविण्यासाठी विद्यार्थांना वेल्डिंग वर्कशॉपमधील मशीन वापराव्या लागल्या. कमी पाण्यात तग धरतील अशी झाडे शोधून त्यांचे योग्य वृक्षारोपन विद्यार्थ्यांनी केले. बांबूवर प्रक्रीया करून त्यापासून प्रवेशद्वार केले गेले. स्थानिक माती
,दगड ,वाळवलेली लाकडे यापासून विविध रंग वापरून सजावट करता आली. वेगवेगळ्या
विषयातील १० धडे पूर्ण करत व काम करत ४०विद्यार्थ्यांनी
२ महिन्यात
बाग तयार केली .सर्वात शेवटी सर्वांनी आपल्या भाषेत अनुभव लिहिले. बागेची
निर्मिती
करतांना विद्यार्थ्यांनी
व्यवसायिक
कौशल्ये मिळवलीच पण त्याबरोबर ज्ञान कसे मिळवायचे ,प्रश्नांना उत्तर कशी शोधायची हे ते या कामाबरोबर शिकली. हे सर्व शिक्षण त्यांना अगदी सहजपणे घेता आले. कार्यकेंद्रि
शिक्षणपध्दतीत आपल्याला असेच शिक्षण शाळां मधून हवे आहे.
व्यवसाय शिक्षण व कार्यकेंद्री शिक्षण
या दोन्ही मधील फरक आपण
नीट समजून घ्यायला हवा. सध्या इ. ९वी पासून माध्यमिक स्तरावर ’व्यवसाय
शिक्षणाची’ वेगळी शाखा काढण्याचे प्रस्तावित आहे शालेय स्तरावरील शिक्षणाचा उद्देश हा केवळ कारखान्यासाठी कुशल कामगार पुरविणे इतका मर्यादित असू नये तर विद्यार्थ्याच्या बौद्धिक विकासासाठी कार्यकेंद्री शिक्षणाचा आग्रह आपल्याला धरायला हवा.
व्यवसाय शिक्षण
|
उत्पादक कामातून शिक्षण à
कार्य केंद्री शिक्षण
|
(१)एका विशिष्ट कौशल्याचे प्रशिक्षण
|
१.सर्व मुलभूत जीवन उपयोगी कौशल्यांचे शिक्षण. मुलांचे
अनुभव विश्व वाढवण्यासाठी बहुविध कौशल्यांचे शिक्षण.
|
(१)विशिष्ट कौशल्याचे प्रशिक्षण कदाचित आयुष्यभर उपयोगी ठरत
नाही.
|
३.’कसे शिकावे’ व
नवीन कौशल्य कशी शिकावीत या क्षमतांच्या विकासावर भर.
|
(१)विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी व चांगले कारागिर तयार
व्हावे ही अपेक्षा.
|
४.सृजनशील, उपक्रमशील, धडपड करणारा, मानवी मुल्ये
बाळगणारा नागरिक बनवणे हे उद्दीष्ट.
|
(१)ब-याच वेळा व्यवसाय शिक्षण हे फ़क्त गरिब, कष्टकरी,उच्च शिक्षण
परवडू न शकणा-या, कमी गुण असलेल्या ’ढ’ (?) मुलांसाठी असा
अलिखित पण रुढ समज आहे. अंमलबजावणी पण त्याच प्रकारे केली जाते.
|
५.शिक्षण शास्त्रातील संशोधनानुसार विद्यार्थ्यांच्या
बुध्दीमत्तांचा विकास व्हावा म्ह्णून सर्व सामाजिक व आर्थिक परिस्थितीतील
विद्यार्थ्यांनी ’हाताने काम
करत शिकावे’ ही भुमिका
आहे.
|
सुदैवानं महाराष्ट्रात कार्यकेंद्री संकल्पनेकडे जाणारे अनेक प्रयोग झाले आहेत. मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा पुर्वव्यावसायिक अभ्यासक्रम वरील
उद्दीष्टांनुसार विकसित झाला आहे. आता गरज
आहे शिक्षण कृतीशील व अर्थपूर्ण बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतून उत्पादक कामात भाग घेण्याची संधी देण्याची!
२१ व्या शतकासाठी आवश्यक शिक्षण देण्यासाठी आपल्याला
कार्य केंद्रि शिक्षणाचा स्विकार करायला हवा. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५
मध्ये म्हटल्यानुसार कार्यकेंद्रि शिक्षण पध्दतीची परिणामकारकपणे अंमलबजावणी
केल्याशिवाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे शक्य होणार नाही. - डॉ.योगेश कुलकर्णी
विज्ञान आश्रम,
पाबळ जि.पुणे
vapabal@gmail.com
No comments:
Post a Comment