Thursday, February 7, 2013

माध्यमिक शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण नव्हे तर ’कार्य केंद्रि’ शिक्षण


उत्पादक कामाचे शिक्षणाचे माध्यम म्हणून असलेले महत्व विविध शिक्षणतज्ञ शिक्षण आयोगांनी मान्य केले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा [२००५]मध्ये ज्ञानरचनावादाचा पुरस्कार केला आहे. अभ्यासक्रम बनवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये १) शाळेतील ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध असावा.२) शिकणे हे घोकंपट्टी नसेल ३) अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तकांपर्यंत मर्यादित नसेल असे सुचवले आहे. प्रत्यक्ष कामातील सहभागातून विद्यार्थी ज्ञानाचे रुपांतर अनुभवात करु शकतील. त्यातून त्यांच्यात विविध मुल्ये, व्यवहारज्ञान, सृजनशीलता विकसित होतील व त्यासाठी प्राथमिकस्तरापासूनच 'कामातून' शिक्षण देण्याचे सुचवले आहे.
माध्यमिक स्तरावर शाळॆत व समाजातील उत्पादन होत असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे असे अपेक्षिले आहे. मात्र प्रत्यक्ष कृती करण्याबाबत सर्व पातळीवर शांतता आहे.
शाळांमध्ये शास्त्र विषयात जे प्रकल्प केले जातात ते ब-याच वेळी विद्यार्थी व पालकांनी घरीच करायचे असतात. प्रकल्पांचे स्वरुप ब-याच वेळा सर्व्हेक्षण किंवा वहीत फ़ोटो चिटकवणे इ. पुरते मर्यादित रहाते असा अनुभव आहे. विद्यार्थ्यांना शाळेत 'हाताने काम करायची संधी' द्यायला आपण कमी पडत आहोत. अशा सर्व उपक्रमांचा समावेश हा 'शाळा बाह्य उपक्रम' किंवा शिक्षणेतर उपक्रम म्हणून केला जातो. थोडक्यात जे शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचे व शिक्षणशास्त्रावर आधारलेले आहे ते सर्व अवांतर किंवा शाळाबाह्य उपक्रमा अंतर्गत अशी आजची परिस्थिती आहे. शिक्षण विषयक आराखड्यातील उद्देश प्रत्यक्षात आणण्याची इच्छाशक्ती आपण दाखवणार नसू तर शिक्षणात परिवर्तनाची आशा कशी करता येईल?
 'कार्यानुभव' विषयाची दुर्दशा :-
शालेय शिक्षणाची जी १५ उद्दीष्टे राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दिली आहेत त्यापैकी ७ उद्दीष्टांच्या पुर्ततेसाठी व प्राथमिक शिक्षणाच्या १८ पैकी ९ उद्दीष्टांच्या पुर्ततेसाठी विद्यार्थ्यांनी हाताने काम करणे आवश्यक आहे. मात्र कार्यानुभव विषयाला केवळ शालेय तासिका दिल्या आहे. त्यातील ५०% वेळ हा माहिती तंत्रज्ञान विषयाला दिला आहे. म्हणजेच आठवड्याला केवळ २ तासिका (१ घड्याळी तास) हा हाताने काम करण्यास दिला आहे. या विषयासाठी असलेला अपुरा वेळ, साधनाची कमतरता यामुळे या विषया अंतर्गत काही ठोस होत नाही. काही शाळांमध्ये संगणक हा विषय कार्यानुभावला पर्याय म्हणून दिला आहे. संगणक हे   साधन आहे  त्याचा वापर येणे आवश्यक आहे पण त्यासाठी विद्यार्थ्यामधील बुध्दिमत्ता विकासासाठी आवश्यक असे विविध कार्यानुभव देणे ही शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी आहे. शिक्षण हक्क कायद्यात अर्धवेळ कार्यानुभव शिक्षकाची तरतूद केली आहे. काही प्राथमिक शाळांमध्ये गावातील कुशल व्यक्तींना या विषयासाठी मानद शिक्षक म्हणून बोलावणे सुरु झाले आहे. मात्र हे खुप तोडके असून अजून खुप करण्याची गरज आहे.
 माध्यमिक स्तर पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम:-
महाराष्ट्रात . वी  ते १० वी  साठी v,v v असे तीन पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्याच्या अंमलबजावणीसाठी फार गोंधळाची स्थिती आहे.पुनर्रचित अभ्यासक्रमात  ८वी साठी पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रमाचा समावेशच केलेला नाही. व्यवसाय शिक्षण खात्याने नविन शाळांना या अभ्यासक्रमास  मान्यता  देण्यासाठी अनावश्यक आर्थिक  पायाभूत सुविधांच्या अटी घातल्या आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकसन अभियाना अंतर्गत  इ.९वी पासून  व्यवसाय   शिक्षणाचा समावेश करण्याची घोषणा झाली. इ. ९वी पासून व्यवसाय शिक्षणाची स्वतंत्र  व सध्याची प्रचलित पुस्तकी शिक्षणाची स्वतंत्र शाखा अशा समांतर व्यवस्था या धोरणात प्रस्तावित आहे. उद्योगांना लागणारे कुशल कामगार बनविण्यासाठी व ज्यांना उच्चशिक्षण घेता येत नसेल  त्यांच्यासाठी ही समांतर व्यवस्था असेल.
’कार्य केंद्रि’ पध्दतीत अपेक्षित, सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ’उत्पादक कामातून’ शिक्षण यात प्रस्तावित नाही. थोडक्यात  केवळ  अपरिहार्य  परिस्थितीमुळेच विद्यार्थी या व्यवस्थेत जातील. प्रत्येक विद्यार्थ्याला  त्याच्या क्षमतेचा  पूर्ण विकास करता येईल असे शिक्षण देणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असायला हवे. केवळ कुशल कामगार पुरवणे हे माध्यमिक शिक्षणाचे  उद्दिष्ट कसे असू शकेल? आपल्याला या देशाची ओळख केवळ कामगारांचा देश करायची आहे की उद्योजकांचा, संशोधकांचा, कलाकारांचा, उद्दमशील समाज असा देश करायची आहे? यावरच आपल्याला केवळ नोकरी देणारे शिक्षण द्यायचे की सर्वांगिण कार्यकेंद्रि शिक्षण द्यायचे हे ठरणार आहे.  
 मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख (Introduction to Basic Technology (IBT))
 आपल्याकडील इ. ८ वी ते १० वी चा अभ्यासक्रम (v१) हा विषय कार्यकेंद्री शिक्षणाच्या दिशेने  जाणारा आहे . महाराष्ट्रातील ९० च्या वर शाळांमध्ये हा अभ्यासक्रम राबवला जातो. यात विद्यार्थी अभियांत्रिकी, ऊर्जा पर्यावरण,शेती पशुपालन ,गृह आणि आरोग्य या विविध कौशल्याचे शिक्षण प्रत्यक्ष काम करत घेतात. शिकतांना विविध समाजोपयोगी कामे विद्यार्थी करतात. उदा. तांदूळवाडी तील [सातारा]शाळेतील विद्यार्थ्यांनी दस-याला झेंडुचे पीक घेतले जवळ्याच्या कंपन्यांना हार बनवून  विकले व शाळेला जवळजवळ २०,०००रु .मिळवून दिलेत. गावडेवाडी शाळेने पाणी साठवण्याचा बंधारा बांधला व शाळेत उसाचे उत्पन्न घेऊन कारखान्याला तो पुरवला. चिखलगाव शाळेतून LED बल्ब चे कमी खर्चातील दिव्याचे उत्पादन व विक्री केली जाते. गावातील विहिरींची पाणी व माती परीक्षण ,इंटरनेट चा वापर  करून शेती विषयक सल्ला मिळवणे ,शोषखड्डे  तयार करणे , फ़ॅब्रिकेशन सेवा, इलेक्ट्रिकल च्या उपकरणांची दुरुस्ती अशा विविध ८५ प्रकारच्या तंत्रज्ञानावर आधारित सेवा IBT शाळांमार्फ़त दिल्या जातात. असे शिक्षण आपल्या शाळेत नेण्याचा आग्रह आता पालक व शिक्षक यांनी धरायला हवा.

महराष्ट्रात .गांधीनी 'नयी तालीम' ची सुरुवात केली.  विनोबातुकडोजी  महाराजांनी जीवन शिक्षणात कृतीशील शिक्षणाचा  आग्रह  धरला. महाराष्ट्रात आनंद निकेतन,सृजन आनंद,विज्ञान आश्रम   यासारख्या अनेक संस्थांनी कार्यकेंद्र शिक्षणाचे प्रयोग केले समर्थ पर्याय दाखवून दिले. महाराष्ट्र शासनाने पण अशा कामांना वेळोवेळी सहकार्य केले, कामांना मान्यता दिली. त्यामुळे शालेय शिक्षणात केवळ उपजीविकेसाठी ,उद्योगांची मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी म्हणून ’व्यवसाय शिक्षण’ नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक शारिरीक विकासासाठी कार्यकेंद्री शिक्षणाचा मार्ग देशापुढे ठेवणे हि महाराष्ट्राची जबाबदारी आहे.



-    डॉ.योगेश कुलकर्णी
विज्ञान आश्रम, पाबळ जि.पुणे
vapabal@gmail.com

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete