एखादी वस्तू तयार केल्याचा, निर्माण
केल्याचा आनंद हा खूप मोठा असतो. त्यामुळे मिळणारे समाधान हे स्वतःचा
आत्मविश्वास वाढवणारे असते. आजच्या “विकत
घ्या, वापरा आणि फेका” या
संस्कृतीत, स्वतःने एखादी गोष्ट तयार करण्याचा
आनंद आपण गमावत आहोत. माझ्या लहानपणी म्हणजे २०- २५
वर्षांपूर्वी संक्रांतीला उडवण्यासाठी पतंग बनवणे हा मुलांना मोठा उद्योग असे. त्यासाठी
योग्य कागद निवडणे, बांबूची कामटी सोलून योग्य जाडीची कडी
बनवणे. काच रांगोळी एकत्र करून पतंगीचा मांजा तयार
करणे. या सर्व गोष्टी केल्यावर पतंग उडवणे हा
परिपूर्ण अनुभव असे. यात पतंग उडवण्याबरोबरच अनेक कौशल्य व
ज्ञान मिळत असे. ’हाताने काम करत शिकणे’ ही शिकण्याची नैसर्गिक पध्दत आहे व बुध्दिमत्ता
विकासासाठी पण आवश्यक आहे, हे आता आधुनिक शिक्षण संशोधनाने पण मान्य केले
आहे.

विज्ञान आश्रमाच्या कामा निमित्ताने मला अनेक ठिकाणी बोलण्याची व लिहण्याची संधी मिळते. मला स्वत:ला यातून खुप शिकायला मिळते.या सर्व लिखाणावर विज्ञान आश्रमातील (www.vigyanashram.com ) कामाचा व डॉ.कलबाग यांच्या ’Rural Development through Education system (RDES)' या संकल्पनेचा खुप प्रभाव आहे. असं सर्व प्रासंगिक लिखाण या ब्लॉग वर मांडण्याचा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या सुचना व चर्चेचे स्वागत आहे. आपला : डॉ.योगेश रमेश कुलकर्णी
Saturday, December 14, 2013
विज्ञान आश्रमाचा आघाडीचा अभ्यासक्रम मूलभूत ग्रामीण तंत्रज्ञानाची पदविका (DBRT)
विज्ञान आश्रमाने विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या आणि अगदी
सुरुवातीपासून राबविलेला कार्यक्रम म्हणजे ग्रामीण तंत्रज्ञानाचा. मागच्या अंकात म्हटल्याप्रमाणे
हे तंत्रज्ञान चार भागात शिकवले जाते - पर्यावरण - शेती - पशुपालन आणि यांत्रिकी आणि
गृह आरोग्य.
ज्यांना कोणाला हे तंत्रज्ञान शिकायचे आहे. त्यांना थोडे गणित, लिहिणे वाचणे
व्यवस्थित येते ना, आठवीपर्यंतचे शिक्षण आहे ना, त्यांचे वय चौदा
वर्षांपुढे आहे ना, त्यांना एकट्याने घराबाहेर वर्षभर राहता येईल ना, याची खात्री
केली जाते. बाकी हिंदी - मराठीचे व्यवहारापुरते ज्ञान असले की मार्कांची काही अट नसते.
सर्व प्रकारची मुले, कमकुवत गटातली, अतिरिक्त ऊर्जा दाखवणारी, कमी - जास्त
हुशार, काही वेगळे करण्याची इच्छा असलेली - जशी येतील त्या क्रमाने
प्रवेश घेऊ शकतात. एच.आय.व्ही. असेलेली देखील असतात, सगळे अभ्यासक्रम
ती शिकतात. आमच्या अपेक्षा स्पष्ट असतात. स्वतः हाताने काम करायची तयारी वही. पुढे
व्यवसाय करायची इच्छा हवी आणि पाबळसारख्या ठिकाणी एकटे राहण्याची तयारी हवी. आश्रमात
कमीतकमी सोयीमध्ये सगळ्यांना रहावे लागते.
Subscribe to:
Posts (Atom)