Tuesday, February 21, 2012

IBT ची सुरुवात – यवतमाळ मधील


 
मागील आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातीत बोटोनी गावातील शाळेत IBT उपक्रमात बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन लावले होते. त्यासाठी यवतमाळला गेलो. जातांना रुकसारचा नंबर आठवणीने घेऊन गेलो होतो. दीड-दोन वर्षापूर्वी मुकुटबंध गावातील IBT शाळेतील विद्यार्थ्यांशी बोलतांना, विद्यार्थ्यांनी ’का, कसे, केव्हा, कुठे’ असे प्रश्न विचारायची सवय लावली पाहीजे, योग्य प्रश्न विचारता आले की योग्य उत्‍तरे मिळतील इ. मार्गदर्शन पर बोललो होतो. जाताना तुम्हाला ज्या प्रश्‍नाची उत्तरे मिळणार नाहीत, ती माझ्याकडे पाठवा असे पण सुचवले होते. त्यानंतर काही महिन्यांनी मला शाळेतील मुलींचा फ़ोन आला. दुसर्‍या बाजुला ३-४ मुली असाव्यात असे त्यांच्या कुजबुजी वरुन वाटत होते.