Wednesday, November 5, 2014

बारगांव पिंप्रीची कृतीशील शाळा


बारगांव पिंप्रीची कृतीशील शाळा

शाळेतील मैदानावर खेळण्यासाठी आखणी करण्यासाठी फ़क्की मारणे हे नेहमीचेच. हे करतांना हात तर पांढरे होतात व रेषा पण एकसारख्या येत नाही. यावर उपाय म्हणून १० वी च्या विद्यार्थीनींनी प्रकल्प म्ह्णून चक्क फ़क्की मारण्यासाठी एका गाडीची निर्मिती केली. त्यामुळे फ़क्की ची नासधूस तर वाचलीच शिवाय एकारेषेत मैदानाची आखणी होऊ लागली. ही शाळा व विद्यार्थींनी आहेत नासिक जिल्ह्यातील सिन्नर तालूक्यातील बारगांव पिंप्री येथील शाळेतील !  

Sunday, October 5, 2014

मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (Introduction to Basic Technology- IBT) ची आजपर्यंतची वाटचाल


विज्ञानाश्रम ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. प्रयोगशाळेतील प्रयोग हे विविध चाचण्या, परीक्षणानंतरच स्वीकारले जातात. विज्ञानाश्रमातल्या एका वर्षाच्या DBRT (Diploma in Basic Rural Technology) अभ्यासक्रमातून  मुले चांगली विकसित होतात, करियर घडवू शकतात असे लक्षात येत होते. जी मुले शाळेत मागे पडली किंवा बाहेर फेकली गेली अशी मुलेसुद्धा इथे छान शिकतात हे दिसत होते. मग मुलांनी नापास होऊन शाळेबाहेर पडूच नये, तिथे अयशस्वी होऊच नये यासाठी आश्रमात शिकण्याची जी पद्धत आहे, ती शाळेतच वापरता यावी आणि सर्व शालेय मुलांना तिचा फायदा व्हावा; अशा इच्छेने १९८७ पासून पाबळ गावातल्या शाळेत आठवी, नववी दहावीच्या मुलांबरोबर विज्ञान आश्रमाने काम करायला सुरुवात केली. पुढच्या दोन वर्षात आणखी दोन गावात - मुखई आणि धामारी इथेही आश्रमाचे शैक्षणिक प्रयोग सुरु झाले. व त्यातून ’ग्रामीण तंत्रज्ञान’ अभ्यासक्रम तयार झाला. या अभ्यासक्रमाची प्रायोगिक परवानगी SSC बोर्डाकडून घेतली गेली.  तेव्हा डॉ. कलबाग स्वत: शाळेत शिकवत असत. त्यांनी गणित, शास्त्र या विषयात मुलांची समज कशी वाढते याचा रीतसर नोंदी ठेवून ३ वर्ष अभ्यास केला.
१९९० साली SSC बोर्डाच्या समितीने या प्रयोगाचे परीक्षण केले. तेव्हा लक्षात आले, की हा अभ्यासक्रम खरे तर सर्वांसाठीच उपयुक्त आहे. याला ग्रामीणभागापुरते मर्यादित कशासाठी ठेवायचे? त्यामुळे ’ग्रामीण तंत्रज्ञानाचे’ नाव हे  मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (Introduction to Basic Technology (IBT)) असे बदलले गेले. 

माध्यमिक शाळेतील उत्पादक कामातून शिक्षणाचे महत्व व समज - गैरसमज


गरीबी ,बेरोजगारी यासारख्या महत्वाच्या प्रश्नांचे समाधान म्हणून सहजपणे व्यवसाय शिक्षण’ हे उत्तर दिले जाते . मात्र व्यवसाय शिक्षण घेतलेले तरूण (आय. टी.आय पासून ते अभियांत्रिकी पदवी पर्यंत) सुद्धा बेकार का राहतात ? याचा मुळापासुन आपण विचारच करत नाही . बेरीजगारी संदर्भात खालील प्रश्न  मुख्यपणे मांडले जातात .
) उद्योगांना काम करायला योग्य उमेदवार मिळत नाहीत .
) पैसे मिळत असले तरी काम करायला युवक तयार नाहीत.
) शिकले तरी काम मिळत नाहीत.
) काम करणाऱ्याला समाज प्रतिष्ठा नाही.
या संदर्भातील सर्व प्रश्नांचा एकत्रित विचार केल्याशिवाय आपल्याला या समस्येवर उत्तर शोधता येणार नाही . दुर्देवाने आपण सर्वजण मुळ दुखण्याला हात लावता वरवर मलमपट्टी करतो . त्यामुळे दुखणे तसेच रहात आहे. एखाद्या रुग्णाला डॉक्टरांना रोग माहित आहे, त्यावर उपचार माहित आहे . पण तो अंमलात आणायचा नाही अशी आपली अवस्था आहे .या लेखात या संदर्भातील सर्व मुद्दे चर्चेला आण्याचा प्रयत्न आहे.