Saturday, June 25, 2011

सृजनशील शिक्षण

पॅरीस युनिर्व्हसिटीचे डॉ. फ़्रानझ्वा नुकतेच पाबळला येऊन गेले. त्यांच्या बरोबर अनेक विषयावर गप्पा झाल्या.
कार्य केंद्री शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना कृतीशील बनवणारे शिक्षण असे मुद्दे माझ्याकडून मांडले जात होते. त्यावर त्यांनी मला शिक्षणाचे भवितव्य किंवा भविष्यातील शिक्षणा विषयी प्रश्न विचारले. त्यातून मला आपल्या सध्याच्या कामाच्या तुटी जाणावल्या आपला कार्यक्रम हा केंव्हातरी बदलावा लागेल असे वाटले.
काम हे शारीरीकच असायला हवे का ? ते सध्या प्रमाणे उत्पादक कामातून (श्रमाधिष्ठीत )असायलाच हवे का? सध्याच्या समाजाच्या गरजा पूर्ण करतांना त्यात विद्यार्थ्य़ांनी सहभागी होणे अशी अपेक्षा आपण करतो. मात्र सध्याची बहुतांश कामे केंव्हातरी यंत्रावर सोपवणे शक्य होणार आहे.
एखाद्या कामात सातत्य , सारखेपणा आला तर ते काम मनुष्याला कंटाळवाणे होते. उत्पादकता वाढवण्यासाठी अशी कामे यंत्रावर सोपवता येतात. सध्या काही वेळा यंत्राच्या प्रमाणे माणसाकडून पण यंत्रवत कामे करुन घेतली जातात. अशा कामामुळे रोजगार संधी उपलब्ध होत असली तरी मनुष्याच्या सर्व क्षमतांचा वापर आपण करतो का ?
कुठल्याही मनुष्याकडून केल्या जाणा-या शारीरिक कामाचे यांत्रिकीकरण करणे शक्य आहे. चीन मध्ये मी एक रोबोट बघितला जो शिक्षकाची बरिचशी कामे करत होता. तो विद्यार्थ्यांना रंग ओळख करुन देऊ शकत होता. नृत्याच्या विविध steps शिकवू शकत होता, विद्यार्थ्यांना फ़ुटबॉल शिकवू शकत होता.  त्याला विद्यार्थ्यांचे नाव काय शिकवायचे हे सांगितले की ती कृती विद्यार्थ्यांकडून तो करुन घेत शकत होता. ती बरोबर की चूक हे पण सांगत होता. विद्यार्थ्यांना सध्या शाळेत ज्या प्रकारे एखादा शिक्षक यांत्रिक पणे शिकवतात त्या प्रकारे हा रोबोट ही नक्की शिकवू शकेल.

सध्या आपण करत असलेली विविध कामे उदा.   पाणी तपासणी/ वायरींग / बांधकाम / सुतारकाम / फ़ॅब्रिकेशन यात नवीन बदल होत आहेत. मनुष्याच्या कौशल्यावर कमीत कमी अवलंबून रहावे लागत आहे. पूर्वी पेक्षा वैद्यकीय शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांच्या कौशल्यावर कमीत कमी अवलंबून होत आहेत.हे सर्व होत असतांना आपण कुठल्या प्रकारच्या शिक्षणा चा आग्रह धरला पाहीजे.

अशी कुठली कौशल्य आहेत जी केवळ मनुष्याकडे आहेत. शक्य तेवढी साचेबंद   कष्टाची कामे यंत्रावर सोपवली तर मग मनुष्याने काय केले पाहिजे ?

मनुष्य प्राणी यंत्र यातील फ़रक कुठला असेल तर तो म्ह्णजे माणसाकडे विचारक्षमता आहे. तो नविन कल्पना करु शकतो. सृजनशील कामे करु शकतो. नवीन संशोधन करणे , कलांचा आस्वाद घेणे , नविन कलांची निर्मिती करणे , निसर्गातील उकललेल्या रहस्यांचा शोध घेणे ही कामे यंत्र करु शकणारी नाहीत,  मात्र मिळालेल्या माहीतीचे विश्लेषण / सांख्यिकी कामे ते करु शकतील म्हणजेच भविष्यातील समाजाचा विचार करताना यंत्र आणि माणूस असा एकत्र विचार करावा लागेल.

विद्यार्थ्यांना अधिक सृजनशील कसे बनवता येईल याचा शिक्षकाला विचार करायला हवा. विद्यार्थ्यांचा बौध्दीक कौशल्यांचा / सृजनशीलतेचा चा विकास हा नवीन समाजात महत्वाचा आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण देणे अभिप्रेत नाही किंवा सध्याची पाठांतरही पद्धत अपेक्षित नक्की नाही. मात्र विद्यार्थ्यांना शिकवतांना शारिरिक श्रम, बुध्दीच्या विकासासाठी व logical thinking विकसित होण्यासाठी आवश्यक activities , नव्या समाजासाठी लागणारी नविन कौशल्ये , उपयोजन कौशल्ये याचा अंतर्भाव आपल्याला आपल्या कामात करावा लागेल. त्यानुसार आपली प्रात्यक्षिके / syllabus orient करावा लागेल.
मला वाटते  fab lab  मध्ये अशा शिक्षणाचा विचार करायची क्षमता आहे. मात्र आपण या संकल्पनां वर पुर्ण लक्ष देऊन काम करायला हवे. 

डॉ. फ़्रान्झवा गप्पा मारतांना म्ह्णाला की आपली सध्याची पिढी पुढील काळासाठी च्या नविन शिक्षण व्यवस्था visualize  करु शकेल असे मानणे सुध्दा कठीण आहे. मात्र आपली पुढची पिढी असे करु शकेल अशी शक्यता निर्माण करणे शक्य आहे. सध्याचे शिक्षण हे Education version 0.0 मानले तर माणसातील सर्व क्षमतांचा संपूर्ण विकास ह्या ध्येयासाठी Education version 2.0, 3.0 नव्हे तर Education version X.0 पर्यंत प्रगती करावी लागेल.   IBT या प्रवासातील एक टप्पा असला तरी त्याच्या पुढे खुप जावे लागेल.

No comments:

Post a Comment