Wednesday, December 14, 2011

सृजनशील – कल्पकतेच्या .. थोडक्यात भविष्यातील शिक्षणासाठी....


 सृजनशील – कल्पकतेच्या .. थोडक्यात भविष्यातील शिक्षणासाठी....

मित्रांनो,
      आपण सर्वजण भाग्यवान आहोत. मानवाच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या माहीती तंत्रज्ञान क्रांती (Information revolution` चे आपण साक्षिदार आहोत.
      What is specific to human beings is their Great ability to adapt` हे Socrates ने सांगितले होते. आपण सर्वजण माहीती तंत्रज्ञानामुळे झालेला बद्दल स्विकारत आहोत. शिक्षणाच्या बाबतीत मात्र हा बदल वर वरच स्विकारत आहोत. कसे शिकायचे?‘ यासाठीची आपली बदल प्रक्रीया बैलगाडीच्या वेगाने बदलत आहे.
      उच्च शिक्षणासाठी प्रवेश देतांना मार्कस बघितले जातात आणि परिक्षा घेतांना तुमचे Computation Skill  (गणिती क्षमता) व स्मरणशक्‍तीची परिक्षा बघितली जाते. खरे तरं या दोन्ही गोष्‍टी संगणक तुमच्या पेक्षा उत्तम करु शकेल. काही वर्षापूर्वी, गॅरी कास्परॉव व संगणक यात बुध्दीबळाचा सामना झाला. व या जगज्येत्या गॅरी कास्परॉवला संगणकाने हरवले. नंतर गॅरी ने मग दुसरा एक सामना आयोजित केला. त्यात गॅरी कॉस्परॉव विरुध्द संपूर्ण जग असा सामना झाला. त्यात जगातील कोणीपण खेळू शकणार होते. त्यात तुम्ही तुमच्या संगणकाला पण घेऊन येऊ शकाल किंवा तुम्ही तुमच्या संगणकाला बरोबर घेऊन सहभागी होऊ शकाल. यात लक्षात आले की मनुष्य व मशिन मिळून खेळू लागले तर खेळाची क्षमता अधिक वाढू शकते व खेळ अजून उंचीवर नेता येईल. थोडक्यात भविष्‍यात आपल्याला मशिन चा वापर हा आपल्या विचारांच्या प्रक्रियेचा अविभाज्य भागच करावा लागेल. जी कामे संगणक करू शकतो ती कामे मानवाने करायची गरज असणार नाही. त्यामुळे जर आपण केवळ गणिती प्रक्रिया’ Computation`  आणि स्मरण कौशल्ये याला शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग समजणार असू तर आपण टिकणार नाही.
      सतरावे शतक (.स १७०० ते १९५०) या काळात शास्त्रीय ज्ञानात दर पंधरा वर्षानी दुप्पट या वेगाने ज्ञानाची वाढ झाली. (Exponential growth) [Ref. `Science Since Babylon`- Derek de solla price] वाढ झाली. मात्र आता पंधरा वर्ष हा खुप मोठा काळ झाला आहे.
नविन तंत्रज्ञानामुळे संगणकाची गणिती क्षमता दरवर्षी दुप्पट होत आहे. तर नविन माहीती ६६% दरवर्षी या वेगाने वाढत आहे.
      त्यामुळे या बदलात टिकायचे असेल तर या बदलावर स्वार व्हावे लागेल. त्या वेगाने पळावे लागेल आणि जर तुम्हालाच बदलाला दिशाद्‍यायची असेल तर तुम्हाला बदलांच्या पुढे असले पाहीजे. म्हणजेच Ahead of Time` असायला पाहीजे. सध्या बर्‍याच जणांना वाटते आम्हाला Computer वापरता येतो म्हणजे Type करता येते, Mail करता येते, Site बघता येतात. MS - CIT झाले, आता खुप झाले. हे सर्व तर यायलाच हवे. संगणक  न येणार्‍यांना Computer illiterate (संगणक निरक्षर) म्हणायचे. मात्र आता केवळ संगणक साक्षरता उपयोगाची नाही. आता जेव्हा जग Web 2.0 कडे चालले आहे तेव्हा दोन प्रकारचे संगणक वापरणारे लोक असतील.
 () ज्यांना Computer चे वापरता येतो, इंटरनेट वापरता येते , Search करता येतात. ज्यांना टाईप करता येते, ई मेल करता येते तो एक गट.
 () आणि दुसरा गट, ज्यांना संगणक वापरुन मिळालेल्या माहीतीचा उपयोग करता येतो. माहीती कुठली व कशी मिळवायची, तिचा वापर कसा करायचा हे ज्ञान असते.

काही प्रगत शाळांमध्ये बर्‍याच वेळा विषय शिकवण्यासाठी संगणक वापरतात. मात्र इतरत्र बहुतेक शाळांमध्ये संगणक शिकवण्याचा वेगळा तास असतो. खरतरं माहीती तंत्रज्ञानाचा वापर नेहमीच्या शिकवण्याचा अविभाज्य भाग व्हायला हवा मी चीन मध्ये एक शिक्षक रोबोट बघितला. तो विद्यार्थ्यांना शिकवू शकत होता. त्याला विद्यार्थ्यांचे नाव व काय शिकवायचे ते सांगितले (Feed) केले की ती कॄती विद्यार्थ्यांकडून तो करुन घेऊ शकत होता. गाणे व नाच करुन दाखवत होता. चूक बरोबर सांगू शकत होता. म्हणजे केवळ मौखिक पध्द्तीने एखादी कविता/ धडा/ शास्त्राचा धडा शिकवला जात असेल तर ते काम उद्या रोबोट वर सोपवता येईल.
जग Automation कडे जात आहे. पूर्वी शस्त्रक्रिया (Operation) साठी डॉक्टरांकडे खुप कौशल्य लागायचे. आता शस्त्रक्रिया (Operation) हे डॉक्टरांच्या कौशल्यांवर कमीत कमी अवलंबून होत आहेत. पूर्वी दगड हाताने फोडत आता जेसीबी कंपनीच्या earth mover ने ते काम लवकर करता येते. या वर्षी तर किसान प्रदर्शनात शेतीसाठी वातानुकुलीत ट्रॅक्टर ठेवला होता. शेतीत पण Automation होत आहे. कारखान्यात पण रुटीन (एकसुरी) कामे यंत्रावर सोपवली जात आहे. थोडक्यात काय, ट्रेन्ड (रुढी) असा आहे की जी कामे कष्‍टाची आहेत, श्रमाची आहेत, ज्या कामात तोच तोच पणा आहे (Routine) आहे, ती सर्व कामे मग पुस्तकातून वाचून , तेच तेच शिकवणे    असो, शेती करणे असो, शस्त्रक्रिया असो , ही सर्व यंत्रांवर सोपवणे शक्य आहे. सध्या तर संगणक/ यंत्रमानव हे शास्त्रीय संशोधन (Scientific research) करू शकतील इतके सक्षम झाले आहेत. आता तुम्ही मला विचाराल, सगळीच कामे यंत्र करु लागलेत तर मग माणसाने काय काम करायचे ? खरे तर हा अवघड प्रश्‍न आहे.

आणि भविष्यात आपण काय करायचे? यावरच आपण आज कसे शिकायचे हे ठरवणार आहे.

त्यामुळे गणिती क्षमता (Computing skills) व स्मरणशक्‍ती या वर अवलंबून न रहाता त्या पलिकडे सृजनशीलता (Creativity) विकसित करणार्‍या शिक्षणाचा विचार आपल्याला करावा लागेल. मनुष्य व प्राणी यातील मुळ फरक फक्‍त कल्पनाशक्तीचा (Creativity) आहे. नवीन निर्माणक्षमतेचा आहे. त्यामुळे आता आहे विश्वातील ज्ञान वाढवणे , ज्ञानाची उपासना करणे हेच काम भविष्यातील मानव जातीला करावे लागेल. ‘The Rice Get Richer` श्रीमंत माणसेच अधिक श्रीमंत होतात, याला मॅथ्यू परिणाम (Matthew Effect) म्हणतात. आणि हा नियम ज्ञानाला ही  लागू होतो. ‘The more you know....The more you can learn` तुम्हाला जेवढे जास्त ज्ञान आहे तेवढे जास्त तुम्ही अजून शिकू शकतात. त्यामुळे आपल्या भविष्यात अश्या समाजाकडे जावे लागेल की जो संशोधक व कल्पक असेल. विविध कलांत नवनिर्मिती करेल.
      आता मला तुम्ही विचाराल, सृजनशील (creative) व्हायचे, संशोधक (Innovator) व्हायचे तर काय करायला हवे ? आणि त्याचे उत्तर खुप सोपे आहे. निसर्गाने त्याची योजना खुप आधी केली आहे. आपण ज्या प्रकारे शिकत आहोत ती पध्दत अलिकडील २०० वर्षातील, मात्र मानव जातीच्या जन्मापासून आपण देवाच्या शिक्षण योजनेने शिकत आहोत. आता पर्यंत लागलेले सर्व महत्वाचे शोध हे याच शिक्षण पध्दतीत तयार झालेल्या संशोधकांनी लावले आहेत. देवाची ती योजना म्ह्णजे : à
 (*) देवाने माणसाला डोके दिले...विचार करण्यासाठी, हात दिले निर्मिती करण्यासाठी‘, ‘ह्रदय दिले...सद्भभावने साठी दुसर्‍यांचा विचार करण्यासाठी
आता पर्यंतची सर्व मोठे शोध मग ते चाकाचे असो, अग्नि निर्माण करायचे असो, शेती किंवा आयुर्वेदाचे असो ती याच शिक्षण योजनेमुळे शिकलेल्या मानसांकडून झाली. ताजमहाल बनवणारे कारागिर किंवा कुतुबमिनार बनवणारे ’धातू तज्ञ (Metallurgist) ते याच पध्दतीने घडले. यापैकी कोणीही शाळेत जाऊन १० वी पास झाले नव्हते.
      मन , मेंदू आणि मनगट (Head, Hand and heart) यांचा संगम झाला की त्यांच्या समन्वयाने होणारे शिक्षण हे खरे शिक्षण असते. आधुनिक शिक्षणशास्त्राने पण प्रत्यक्ष हाताने काम करण्याचे, ’शिक्षण’ घेण्याच्या प्रक्रियेतील महत्व मान्य केले आहे. त्यामुळे नवीन शिक्षणाचा विचार करतांना Back to Basic कडे जावे लागेल. बर्‍याच शाळा आम्ही प्रकल्पातून शिक्षण Activity Based Education` म्हणजेच तेच करतो असे म्हणतात. पण ते अर्धवट आहे. ‘हाताने कामहे नुसते काम असून चालत नाही तर ते उत्पादकअसावे लागते. समाजातील सध्याचे प्रश्‍न व ते सोडवायचा प्रयत्‍न या प्रकल्पातून व्हायला हवे. शाळातील बरेच प्रकल्प हे माहीती संकलनवा सर्वेक्षण पध्दतीचे असतात. मात्र सृजनशीलता (Creativity) विकसित होण्यासाठी समाजातील गरजा सोडवायचा प्रयत्‍न व त्यासाठीच्या कल्पना शाळेतून प्रकल्प म्हणून राबवल्या जायला हव्यात. आपल्या सभोवतालचे प्रश्न सोडवायचे शिक्षण दिले तर त्यातूनच कल्पना शक्तीचा विकास होईल.
      आमच्या एका शाळेतील १० वी च्या मुलांनी आजोबांना संडासमध्ये कमोडची खुर्ची बनवून दिली, उठण्यासाठी संडास मध्ये बारबसवला. नळाला पाणी पहाटे येते. त्यासाठी रांग लावून पाण्याची वाट पहावी लागते. म्हणून नळाला पाणी आले की सायरन वाजणारे यंत्र तयार केले. कचरा गोळा करणा-या स्वच्छ्ता कर्मचा-यांना प्लॅस्टीक उचलतांना सारखे वाकायला लागू नये, म्हणून यंत्र तयार केले. अशा प्रकारचे प्रकल्प की जे तुमच्या सभोवतालच्या प्रश्‍नांवर आधरित असतील ते तुम्हाला विचार करायला शिकवतील. त्याची उत्तरे अजून कोणी शोधली आहेत का हे समजण्यासाठी तुम्हाला Internet/library वापरावी लागेल व त्यातून ’माहीती चे उपयोजन’ करण्याचे कौशल्य मिळवता येतील.
मला बरेच विद्यार्थी विचारतात की पण समाजातील प्रश्‍न शोधायचे कसे?’ फ़ार पूर्वी सॉक्रेटिस नावाचा थोर तत्ववेत्‍ता होऊन गेला. त्याची विचार करायची किंवा शिकवण्याची पध्दत सॉक्रेटिस Method’ म्हणून प्रसिध्द आहे. तो लोकांना विविध प्रश्‍न विचारायचा , उदा. शहाणपण म्हणजे काय?’ ‘सुंदरता म्हणजे काय?’ ‘योग्य काय आहे?’ आणि असे विविध प्रश्‍न विचारुन शिष्यांना विचार करायला लावायचा. त्यातून तो योग्य उत्तरांकडे घेऊन जायचा. सॉक्रेटिसला जगातील सर्वात ज्ञानी माणूस म्हटले होते.’ त्यावर सॉक्रेटिस म्हणाला मी ज्ञानी आहे, कारण मला माहीत आहे की मला फारच कमी माहीती आहे.
सॉक्रेटिसची प्रश्न विचारण्याची पध्द्त आपल्याला आत्मसात करावी लागेल.
      मित्रांनो, आपल्याला योग्य प्रश्न विचारायची सवय भविष्यात जाण्यासाठी अंगिकारावी लागणार आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टींबाबत मग ती ’चूकीची-बरोबर’, ’योग्य-अयोग्य’, ’चांगल्या-वाईट’ गोष्‍टी बाबत प्रश्‍न विचारायला शिकायला पाहीजे.
() दरवर्षी पुण्यातील रस्ते खराब का होतात ?
() पुणे कचर्‍याचे शहर का आहे ?
() पहिल्या पंचवार्षिक योजनेत स्वच्छ पाणी पुरवण्याचे लक्ष होते. मग ते १० व्या पंचवार्षिक पर्यंत का पूर्ण झाले नाही ?
() माझा देश गरीब का ?
() पूर का आले, दुष्काळ का पडला ?
(६) शेतकरी आत्महत्या का करतो ?
(७) काही लोकांना कमी श्रमात जास्त उत्पन्न कसे मिळते ?
(८) शेती मालाचे भाव वर खाली कसे होतात व प्रत्येक वेळी शेतकरीच का लुबाडला जातो.

मित्रांनो, तुम्हाला योग्य प्रश्‍न विचारता येऊ लागले. की तुम्ही त्याची उत्तरे शोधायचा प्रयत्न
कराल. त्यातून आपण सध्याचे ज्ञान वाढवू शकू, प्रगती करु शकू. नाहीतर आपण मानवाला मिळालेल्या मेंदूचा योग्य वापर करत नाही असे होईल.

आपल्याला भविष्यात जी कौशल्ये आवश्यक आहेत ती कौशल्ये मिळवायलाच लागतील कारण आपल्याला भविष्यात रहायचे आहे.


मित्रांनो, उपलब्ध माहीतीचे ज्ञानात रुपांतर करायचे व या ज्ञानातून शहाणपणआपल्याला मिळ्वायचे आहे.

सर्वात शेवटी एका Honey Bird ची गोष्ट सांगतो. आफ़्रिकेत Honey Bird हा पक्षी रहातो. तो खुप सुंदर गातो त्याला मधाचा वास येतो मात्र तो फार उडू शकत नाही. मात्र तो आवाजाने मनुष्याला आकर्षित करतो. माणसाच्या अंगावर बसून तो मधाच्या पोळ्यापर्यंत माणसाला नेतो. त्याला स्वतःला मधाचे पोळे फोडता येत नाही. त्यामुळे माणसाने मध फोडायची तो वाट पहातो. मध निघाल्यावर Honey Bird ला मध द्यायची प्रथा आहे. आशी म्हण आहे की , जर तूम्ही Honey Bird ला मध दिला नाही तर पुढील वेळी तुम्हाला मधाच्या पोळ्या ऎवजी वाघाच्या गुहेत नेईल’.
थोडक्यात समाजाच्या मदती शिवाय / मित्रांच्या मदती शिवाय आपण मोठे होणार नाही व जे मिळाले ते Share केले नाही तर नुकसान व्हायची शक्यता जास्त आहे.
     
मित्रांनो, लक्षात ठेवा People Who know `What` and `How’ Will always work for People who know “Why”.

è   डॉ.योगेश कुलकर्णी   ( भाषण : ज्ञान प्रबोधिनी वर्षारंभ समारंभ : ता. ११ जून २०११ )


( संदर्भ : काही उदाहरणे ही डॉ.फ़्रान्झवा टेडी यांचे Wiser-U TEDx भाषणातून घेतली आहेत )




No comments:

Post a Comment