Monday, November 21, 2011

विद्यार्थ्यांमधील कृतीशीलता व बुध्दीमत्ता विकासासाठी शालेय अभ्यासक्रमात कौशल्य शिक्षण


सारांश :
शालेय स्तरावर कौशल्य शिक्षण अंतर्भूत करण्याचा उद्देश हा विद्यार्थांना केवळ रोजगार मिळावा हा नक्कीच नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण वाढीसाठी, त्यांच्यातील विविध बुध्दीमत्तांचा व व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी शालेय शिक्षणात ’उत्पादक कामाचा’ समावेश व्हायला हवा. नविन बुध्दीमत्तेवरील संशोधनाने शिक्षण प्रक्रीयेत ’मन, मेंदू आणि मनगट’ हे एकत्र आल्यावरच चांगले शिक्षण मिळू शकते हे सिध्द केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये श्रम प्रतिष्ठा, संघभावना, व्यवहार ज्ञान, सृजनशीलता यांचा विकास होण्यासाठी शाळेत उत्पादक काम व शालेय विषय यांची सांगड घालावी लागेल. माध्यमिक स्तरावरील कौशल्य शिक्षणाकडे ’व्यवसाय शिक्षण’ असे मर्यादीत न पहाता, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २००५’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे बुध्दीमत्ता विकासासाठीची शैक्षणिक पध्दत  म्ह्णून पाहीले पाहीजे. याच उद्देशाने महाराष्ट्र व इतर राज्यातील ९० च्या वर माध्यमिक शाळांमधे यशस्वीपणे राबवल्या जाणा-या ’मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ (व्ही १) या व्यवसाय पूर्व अभ्यासक्रमाच्या अनुभवावर हा लेख आधारित आहे.

Monday, July 25, 2011

विज्ञान आश्रमा चे संस्थापक डॉ.श्रीनाथ शेषगिरी कलबाग



विज्ञान आश्रमा चे संस्थापक डॉ.श्रीनाथ कलबाग यांचा जन्म 23 ऑक्टो 1928 रोजी दस-याच्या दिवशी झाला. त्यांच्या वडीलांचे पॉप्युलर फार्मसी नावाचे मुंबर्इत दुकान होते. शाळेत असल्यापासूनच विज्ञानाकडे त्यांचा कल होता. घरी ते विविध प्रयेाग करत उदा. साबून तयार करणे, रसायने वापरून कपडे ब्लिंचिंग करणे , कागदावर छपार्इ इ.

Saturday, June 25, 2011

श्रीमती मिरा कलबाग : विज्ञान आश्रमाच्या अम्मा


शिक्षणातून ग्रामीण विकास या ध्येयाने गेली २८ वर्षे विज्ञान आश्रम ही संस्था पुण्याजवळील पाबळ येथे कार्य करत आहे. ’हाताने काम करत शिकणे’ हीच शिकण्याची नैसर्गिक पध्दत आहे यावर डॉ.कलबागांचा विश्वास होता. प्रचलित शिक्षण पध्दतीत शिकण्याची नैसर्गिक पध्दत कशी आणता येईल हे सिध्द करण्यासाठी ’विज्ञान आश्रम’ या शिक्षणाच्या प्रयोगशाळेची स्थापना डॉ.कलबाग यांनी केली. मुंबई तील हिंदुस्थान लिव्हर कंपनीतील वरिष्ठ संशोधकाची नोकरी सोडून पाबळ सारख्या छोट्या दुष्काळ्ग्रस्त गावात येऊन रहाण्याचे धाडस डॉ.कलबाग करु शकले याचे महत्वाचे कारण म्ह्णजे त्यांच्या पत्नी श्रीमती मिरा कलबाग यांनी त्यांना दिलेली मोलाची साथ होय.

सृजनशील शिक्षण

पॅरीस युनिर्व्हसिटीचे डॉ. फ़्रानझ्वा नुकतेच पाबळला येऊन गेले. त्यांच्या बरोबर अनेक विषयावर गप्पा झाल्या.
कार्य केंद्री शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना कृतीशील बनवणारे शिक्षण असे मुद्दे माझ्याकडून मांडले जात होते. त्यावर त्यांनी मला शिक्षणाचे भवितव्य किंवा भविष्यातील शिक्षणा विषयी प्रश्न विचारले. त्यातून मला आपल्या सध्याच्या कामाच्या तुटी जाणावल्या आपला कार्यक्रम हा केंव्हातरी बदलावा लागेल असे वाटले.